ब्राईट फ्युचर आय आय टी & मेडिकल अकॅडमी च्या नीट जे इ इ व एम एच टी,सीईटी क्रॅश कोर्स 2023 विद्यार्थ्यांची ऑनलाइन मॉक टेस्ट संपन्न; अकॅडमीच्या राज प्रकाश माने याचा JEE Mains परीक्षेमध्ये 87 पर्सेंटाइल ने पात्र झाल्याबद्दल सत्कार

ब्राईट फ्युचर आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला मधील विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेच्या सरावासाठी स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर. येथे मॉक टेस्टचे आयोजन नुकतेच करण्यात आले. सांगोला, मंगळवेढा,आटपाडी, जत या तालुक्यातील सर्व सामान्य मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी ही लातूर कोटा कानपूर दिल्ली येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक वर्ग घेऊन अल्पावधीतच नावारूपाला आलेली इन्स्टिट्यूट विद्यार्थी घडविण्याच्या हेतूने प्रसिद्धीच्या झोतात आलेली आहे….
या मॉक टेस्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कंप्यूटर बेस, प्रश्नाचे स्वरूप पीसीएमबी व पीसीबी या विषयातील प्रश्नांचा सराव झाला असून परीक्षेविषयी असणारी भीती व गैरसमज दूर होण्यास मदत झाली आहे. यासाठी स्वेरी कॉलेज इंजिनीअरिंग पंढरपूर खूप मदत झाली . तसेच तेथील प्राध्यापक वर्ग प्राचार्य डॉक्टर रोंगे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.2023 या वर्षी झालेल्या जेईई मेन्स परीक्षेमध्ये पात्र झालेल्या राज प्रकाश माने या विद्यार्थ्याचा सत्कार संस्थापक अध्यक्ष रोंगे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
अल्पावधीतच सांगोला व परिसरात नावा रूपाला आलेल्या ब्राईट फ्युचर अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे फाउंडेशन तसेच प्रिपरेशन, डेली डी पी पी, डाऊट सेशन, विकली टेस्ट, कौन्सलिंग, यामुळे विद्यार्थ्यांची शंभर टक्के यशाची खात्री देणारी एकमेव अकॅडमी म्हणून ब्राईट फ्युचर अकॅडमी ओळखली जाऊ लागली आहे.
स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये एच ओ डी मोरे सर, आर वाय घुटुकडे सर, राठोड सर श्रीमती वाघमारे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्राध्यापक आर वाय घुटुकडे यांनी आपल्या मनोगत मधून या अकॅडमीच्या स्थापने मागील उद्देश विशद केला. या ऑनलाइन मॉक टेस्ट च्या उपक्रमाबद्दल पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दाखविला.