रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने किशोरवयीन मुलांसाठी मार्गदर्शन…

आज आनंद विद्यालय कमलापूरच्या विद्यार्थ्यांसाठी किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन या विषयावरती रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
रोटरी क्लबचे अध्यक्ष मा. डॉ. साजिकराव पाटील यांनी किशोरवयीन मुलांमध्ये या वयात होणारे शारीरिक व मानसिक बदल त्यामुळे मानसिक दृष्ट्या अशांतता व त्यामुळे वर्तनात होणारे बदल याविषयी सविस्तर माहिती दिली .
या वयात समुपदेशनाची आवश्यकता कशी आहे हे सांगताना समुपदेशन व मार्गदर्शन यामधील फरक समजावून सांगितला. तसेच मुलांच्या या वयातील निर्माण होणारे अनेक प्रसंग मुलांसमोर मांडले. तसेच मुलांच्याशी संवाद साधून अडचणी व त्यावर कशाप्रकारे विचार केला पाहिजे.अशी माहिती दिली.
सद्यस्थितीत प्रत्येक शाळांमध्ये समुपदेशकाची आवश्यकता कशी आहे हे अनेक उदाहरणे उदाहरणे व दाखले देऊन सांगितले. तसेच शिक्षक सुद्धा कशाप्रकारे समुपदेशन करतात व मार्गदर्शन करतात याची उदाहरणे दिली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा मुलांना चांगला लाभ होत असतो हे समजावून सांगितले. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मुलांची प्रगती होते व शिक्षक आपले चांगले मित्र असतात त्यामुळे त्यांच्याकडून होणारे समुपदेशन सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले