सांगोला तालुका पेन्शनर संघटनेतर्फे सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुका पेन्शनर संघटनेची बैठक सांगोला येथील कार्यालयात अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या सदस्य सौ. सुनंदा चव्हाण यांना सीबीएस न्यूज चॅनलचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तसेच पेन्शनर विभागाचे काम पाहणारे शिवाजी कवडे तसेच योजना विभागाचे सचिन घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष जयवंतराव नागणे, नामदेव भोसले, कार्याध्यक्ष अरुण वाघमोडे, सदस्य गंगाराम इमडे, विलास नलवडे, लक्ष्मण सावंत, बापूसाहेब लवटे, एकनाथ जावीर, दिनकर घोडके, सौ प्रतिभा शेंडे, सौ. अंबिका शिंदे, सल्लागार शंकर सावंत, प्रभाकर कसबे, सिद्धेश्वर झाडबुके, निवृत्ती मिसाळ, रविराज शेटे, अभिमन्यू कांबळे, दत्तात्रय खामकर, रामचंद्र खांडेकर, दादासो सोनलकर, पांडुरंग गोडसे, अरुण टेळे, सदाशिव पवार इत्यादी उपस्थित होते.