महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरमध्ये मतदार जनजागृती रॅली संपन्न*

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला यांच्या वतीने दि.25 जानेवारी ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ यानिमित्ताने सांगोला शहरांमधून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
‘वोट की किंमत कभी ना लेंगे,परंतु अपना वोट अवश्य देंगे’,’छोड दो अपने सारे काम, पहले करे अपना मतदान’,अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती केली. सांगोला विद्यामंदिरच्या प्रांगणातून सुरू झालेली मतदार रॅली तहसील कार्यालय, जयभवानी चौक, नेहरू चौक, छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणाहून पुन्हा प्रशालेत आली.
या रॅलीमध्ये प्रशालेतील एन.सी.सी. कॅडेट, स्काऊट-गाईड, एस.आर.पी. मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले, सुरेश मस्तुद यांच्या मार्गदर्शनाखाली मकरंद अंकलगी, उज्वला कुंभार, संध्या तेली यांनी रॅली संपन्न करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.