crime

पाणी पिण्याचे कारण सांगत 1 लाख 32 हजाराचे पळविले दागिने

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला(प्रतिनिधी):-अपंग व्यक्तीस पाणी पिण्याचे कारण सांगत उघड्या घरामध्ये प्रवेश करून चोरट्याने 1 लाख 32 हजाराचे दागिने लंपास केले ही घटना 3 जुलै दुपारी 2 ते रोजी सायं. 5 वा.च्या दरम्यान किडेबिसरी, ता.सांगोला येथे घडली असून अनोळखी व्यक्ती विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी वसंत कोळेकर यांचे वडील निवृत्ती कोळेकर हे अपंग व लकवा मारलेले असल्याने त्यांना जागेवरून हलता येत नाही.दि.3 जुलै रोजी दुपारी 2 ते सायं. 5 च्या दरम्यान ते घराच्या बाहेर बसले होते.यावेळी एक अनोळखी व्यक्ती याने वडीलांना पाणी पिण्याचे सांगुन उघड्या घरात प्रवेश केला.यावेळी त्याने घरात असलेल्या कपाटातील 90 हजाराचे 3 तोळ्याचे सोन्याचे साखळीतील गंठण, 12 हजार रू 4 ग्रॅम वजनाचे सोन्याची टिक,6 हजार रू 2 ग्राम वजनाचे कानातील टॉप्स, 15 हजार रुपये किमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातील वेल, 6 हजार रु.किमतीचे 2 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम असा एकूण 1 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

 

याबाबत वसंत निवृत्ती कोळेकर यांनी पोलिसात अनोळखी व्यक्ती विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो.हे.काँ भरमशेट्टी करीत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!