आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने नाझरा विद्यामंदिर च्या मुलींना सायकलींचे वाटप

नाझरा(वार्ताहार):- सांगोला तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रणी असणारी आपुलकी प्रतिष्ठान ही समाजसेवी संस्था तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत मदतीचा हात देत आहे.समाजातील कोणत्याही घटकावर कसल्याही प्रकारचे संकट आल्यास आपुलकी प्रतिष्ठान तात्काळ त्या घटकापर्यंत पोहोचून मदत करत असते. तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपुलकी प्रतिष्ठानने मदत केली आहे. नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील सानिका सोमनाथ वाघमारे,आरती गणेश वाघमारे, गायत्री धनाजी कांबळे या लांबून येणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल देण्यात आली.त्याचबरोबर श्रेयश नारायण बंडगर,अक्षरा संतोष बाबर, शुभ्रा नितीन भंडारे,भक्ती वसंत बंडगर व श्रेयश आनंदा सरगर या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले.आपुलकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजेंद्र यादव व त्यांची संपूर्ण टीम या सेवाभावी कार्यक्रमांमध्ये अग्रेसर आहेत.आज प्रशालेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक बिभिषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,सोमनाथ सपाटे,प्रा. मोहन भोसले यांच्या उपस्थितीत या गरजू विद्यार्थ्यांना आपुलकी प्रतिष्ठानच्या या वस्तू भेट देण्यात आल्या. संबंधित पालकांनी आपुलकी प्रतिष्ठान बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चौकट करणे:- मी विविध ठिकाणी मजुरीचे काम करतो.माझ्या आर्थिक अडचणींमुळे मी माझ्या मुलीला सायकल देऊ शकलो नाही.परंतु सांगोला येथील आपुलकी प्रतिष्ठानने माझी आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन माझ्या मुलीला सायकल दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपुलकी प्रतिष्ठान अतिशय चांगले काम करत आहे.आपुलकी प्रतिष्ठानच्या पुढील कार्यास आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा…. सोमनाथ वाघमारे