sangola

विविध कृषि पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती/संस्था/ गट यांनी अर्ज करण्याचे आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या, कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणा-या शेतक-यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणा-या व्यक्ती / संस्था / गट यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषिभुषण पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या अधिकारी/कर्मचारी यांना पद्द्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.

महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती/गट/संस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी जास्तीत जासत शेतकरी/गट/संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषि पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!