महाराष्ट्र

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा साधेपणा काळजात घर करणारा

तालुक्याचे आमदार पद म्हणजे खूप मोठा व्याप.दिवसभर कार्यक्रमाचं ठरलेलं शेड्युल. त्या शेडूलनुसार प्रत्येक कार्यक्रम पार  पाडताना आमदारांची होणारी दमछाक. कार्यकर्त्याच्या हाकेला ओ देण. त्याच्या सुखदुःखात सामील होणं ही लोकप्रतिनिधीची भूमिका सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आत्मीयतेने निभावताना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब देशमुख आपल्या कार्यकर्त्याच्या लग्नात चक्क मंडपात जेवायला बसतात त्यांचा हा साधेपणा निश्चितपणे उपस्थितांच्या काळजात घर करणारा होता.

सांगोला तालुक्यातील चोपडी येथे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते विशाल चव्हाण व काजल मंडले यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. त्यानुसार वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ते लग्नमंडपात पोहोचले. वधू-वरांना शुभाशीर्वाद व वधू पित्याचा सत्कार केल्यानंतर ते चक्क मंडपातच सर्व कार्यकर्त्यांबरोबर जेवायला बसले. अकरा वेळा ज्यांनी सांगोला तालुक्याचे प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये केलं ते कै.गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख लग्नमंडपात जेवायला बसले आहेत हे कळताच तेथील नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले.

ज्या  पद्धतीने गणपतराव देशमुख यांनी आमदार पदावरती असताना जो साधेपणा जपला तोच साधेपणा डॉ. बाबासाहेब देशमुख जपत आहेत. सांगोला तालुक्याच्या विकासाच्या कामाचा प्रचंड व्याप असताना देखील आपल्या कार्यकर्त्याच्या लग्नात जेवायला बसल्याचे पाहून कार्यकर्त्याच्या पित्याचे डोळे आनंदाने पानावले. त्यांच्या समवेत शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस दादासो बाबर, माजी ग्रामपंचायत सदस्य जालिंदर बाबर, जनार्दन बाबर, हनमंत चव्हाण,किसन जवंजाळ आदी कार्यकर्तेही जेवणात बसले होते. कार्यकर्त्याची लोकप्रतिनिधी वर प्रचंड निष्ठा असते,प्रचंड निष्ठेने तो लोकप्रतिनिधीसाठी काम करत असतो हे आपणास सर्वांना माहिती आहे परंतु एक लोकप्रतिनिधी आपल्या कार्यकर्त्यासाठी त्यांना शुभाशीर्वाद देतो आणि त्यांच्या लग्नात समवेत जेवायलाही बसतो ही बाब मात्र सर्वच लोकप्रतिनिधींसाठी आदर्शवत आहे. सामान्य कुटुंबातील एका कार्यकर्त्याच्या लग्नात कार्यकर्त्याबद्दल लोकप्रतिनिधीने जपलेला हा जिव्हाळा उपस्थित सर्व नातेवाईकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील एवढे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button