अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाज भूषण पुरस्कार प्रा.राजेंद्र ठोंबरे याना जाहीर..

सांगोल येथील प्रा.राजेंद्र ठोंबरे हे ग्रामीण भागातील समाज जीवनात समरस झालेले व्यक्तिमत्व असुन ज्येष्ठ नागरिकाचे स्नेहमेळावे,स्नेहभोजने,लहान मोठ्या सहली,वाढदिवस,एकसश्ठी,पंचाहत्तरी,सहस्त्र चंद्रदर्शन साजरे करणे,वनभोजन,हुरडा पार्टी अशा एक ना अनेक कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांना एकत्र करत आहेत व त्यांच्या उतारवयात चैतन्य निर्माण करण्याचे कार्य करत आहेत…शिवाय वृत्तपत्र लेखनाचया माध्यमातून ते समाज जीवनाशी जोड्ले गेले आहेत..सांगोल रोटरी क्लब, चैतन्य हास्य क्लब अशा माध्यमातून ते सामाजिक व आरोग्य जागृतीचे काम करत आहेत…त्यांच्या या ज्येष्ठ नाग्रिकासाठी करत असलेल्या कार्याची दखल अनेक सेवाभावी व समाज जीवनात कार्य करणार्या संस्थानी घेतली आहे..ठाणे येथील अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या समितीने त्यांच्या कार्याची दखल घेवून त्याना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे..
शुक्रवार दिनांक 3 ऑकटोबर 2025 रोजी ठाणे येथे मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल आणि ग्रंथ भेट देवुन समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे…प्रा.ठोंबरे याना ज्येष्ठ नाग्रिकासाठी घेत असलेल्या विविध उपक्रमाबद्द्ल आतपर्यंत स्टार ऑफ द गेट टुगेदर,द नेशनल एक्सलन्स अवार्ड,जीवन गौरव,महाराष्ट्र आयकॉन आदि विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे..



