धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रचारात मुसंडी; महाविकास आघाडीची प्रचार मोहीम सांगोला शहरात सुसाट

सांगोला(प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिेते पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला शहरातील सर्व प्रभागात ऐकाचवेळी प्रचार मोहिम सुरु करण्यात आली नियोजनबध्द प्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, श्री.बाबुराव गायकवाड, प्रा.प्रबुध्दचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीची प्रचार मोहीम सांगोला शहरात सुसाट असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. इंडिया आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ धैर्यशील भैय्यांना लाभत असल्यामुळे सांगोला शहरासह तालुका परिसरात तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाचा आवाज जोरदार घुमत आहे.
माढा लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत उमेदवारांच्या प्रचारात चांगलीच रंगत येऊ लागली आहे. उमेदवारांसह स्थानिक पदाधिकारी व नेत्यांनी प्रभागात घरोघर जाऊन प्रचार सुरू केला आहे.दिवसभर प्रचारफेर्या काढण्यात येत आहेत, तसेच रिक्षांद्वारेही प्रचार सुरू झाला आहे. निवडणुकीच्या या प्रचारात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.शहरातील प्रत्येक वार्डात, प्रभागात कार्यकर्ते जमा करून प्रचार रॅलीस सकाळपासूनच प्रारंभ करण्यात येत आहे. गळ्यात पक्षचिन्हाचे पट्टे, डोक्यात टोप्या घालून प्रभागात प्रचार केला जात आहे. या प्रचारयुद्धात सध्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिेते पाटील यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.शहरातील त्या त्या परिसरातील महाविकास आघाडी मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिकांशी थेट संवाद साधून मतदारांना धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करून एक चांगला उमेदवार लोकसभेत पाठवूया असे सर्वजण मतदारांना साद घालत आहेत. मतदार देखील यावेळी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद देताना दिसून येत होते.
सांगोला तालुक्यात नाविन्य पुर्ण विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित दर्शवित प्रचारात आघाडी घेताना दिसून येत आहेत. मित्रपक्षाचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने एकत्र काम करत असल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांना सांगोला तालुक्यातून नक्कीच लीड मिळेल असे नागरिकांतून बोलले जात आहे. एकंदरीत ही निवडणूक जनतेने हातात घेतली असून सध्या स्थितीला तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.