रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने म. गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम.
महात्मा गांधी ग्रामस्वच्छता पंधरवडा अंतर्गत रोटरी क्लब सांगोला यांनी सांगोला शहरांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवली.
या कार्यक्रमांतर्गत रोटरी क्लब च्या सदस्यांनी महात्मा फुले चौक, वासूद चौक तसेच भोपळे रोड या भागामध्ये स्वच्छता अभियान राबवले. या ठिकाणी रस्ते स्वच्छ करून घेतले. रस्त्याच्या बाजूचे कचऱ्याचे ढिगारे उचलून नगरपालिकेच्या स्वच्छता ट्रॅक्टर मध्ये टाकले.तसेच आजूबाजूचा पूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी लोकांना कचरा रस्त्यावर न टाकण्याचा सल्लाही दिला.
या कार्यक्रमासाठी रोटरीच्या सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी सांगोला नगरपरिषद सांगोला यांचे कडून विशेष सहकार्य लाभले. यासाठी क्लबचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे,सचिव रो.इंजि.विलास बिले सदस्य रो.इंजि.हमीद शेख,रो. इंजि.संतोष भोसले,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.अरविंद डोंबे,रो.श्रीपती आदलिंगे,रो.अमर जाधव हे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.सुधीर गवळी व श्री.अक्षय गायकवाड यांचे बहुमोल सहकार्य लाभले.