sangola

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आश्वासनानंतर मसनजोगी समाजाने सोडले उपोषण

मसनजोगी समाजातील अनेक लोक गेली 25 ते 30 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ठेकेदारामार्फत काम करतात .अशा गरीब मसनजोगी समाजाच्या मागण्या लक्षात घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, माणसांच्या मृत्यूनंतर महत्त्वपूर्ण अंत्यसंस्कार विधी करावा लागतो . या समाजास येणाऱ्या अडचणीचा सारासार विचार करून त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी मसनजोगी समाजाने केलेल्या मागण्या मुख्यमंत्र्याकडे पोहोचवू .मुख्यमंत्र्यांनी मसनजोगी समाजाच्या विविध प्रकारच्या मागण्या संदर्भात काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी करून न्याय देऊ असे आश्वासन शहाजीबापू पाटील यांनी मसनजोगी समाजाला दिल्याने तीन दिवसापासून सुरू असलेले आमरण उपोषण लिंबू पाणी घेऊन सोडण्यात आले.

मसनजोगी समाजातील नगरपरिषद प्रशासन संचालनालयास आवश्यक माहिती भरून न दिलेले कामगार नगरपरिषद नगरपंचायत हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत 24 काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवक करून घ्यावे. ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या स्मशानभूमीत मसनजोगी म्हणून काम करणाऱ्या कामगारांना अनुदानित सेवेत कायम करून घ्यावे या मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर मसनजोगी समाजाने 30 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणस्थळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भेट देऊन मसनजोगी समाजाच्या मागण्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून न्याय देऊ असा ठाम विश्वास दिल्याने या समाजाने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन दुपारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी दुपारी आपले उपोषण सोडले .
यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आमदार शहाजी बापू पाटील हे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात .

 

सांगोला तालुक्याचा कॅलिफोर्निया करण्यासाठी आमदार साहेबांची धडपड आहे . बापूंकडे मोठी दानत असून कोणालाही ते रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. बापूच खऱ्या अर्थाने जनतेचे नेते आहेत .गरिबाप्रती त्यांच्या मनामध्ये कायम प्रेम भावना असते . मसनजोगी समाजाला खऱ्या अर्थाने आमदार शहाजीबापू पाटील हे न्याय देऊन प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मसनजोगी समाजाचे प्रमुख लक्ष्मण घनसरवाड यांनी महाराष्ट्रात मसन जोगी समाज विखुरलेल्या स्वरूपात असून या समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडून आमदार शहाजीबापू पाटील समाजाला न्याय देतील, असे सांगत बापूंनी दिलेले आश्वासन आमच्या समाजाच्या विकासासाठी निश्चितपणे उपयोगी पडणार आहे असे सांगितले. मसनजोगी समाजाने निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे यांना मागण्यांचे निवेदन दिले

 

यावेळी उपोषण स्थळी, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, तालुकाप्रमुख दीपक खटकाळे, उद्योगपती आनंद घोंगडे, माजी नगराध्यक्ष नवनाथभाऊ पवार, शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली, शिवसेना शहरप्रमुख एससी सेलचे कीर्तीपाल बनसोडे, सोमनाथ ठोकळे, दीपक ऐवळे किसन खंडागळे , किशोर बनसोडे सर आदी प्रमुख मान्यवर व मसनजोगी समाजातील कुटुंब उपस्थित होते .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!