एनसीसी विभागाकडून ग्रामीण रुग्णालय परिसराची स्वच्छता; सांगोला विद्यामंदिरच्या कॅडेट्सचा स्तुत्य उपक्रम
सांगोला (वार्ताहर) “एक भारत-स्वच्छ भारत” अभियाना अंतर्गत ३८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, सोलापूर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम.डी.मुथ्थप्पा यांच्या प्रेरणेतून सांगोला विद्यामंदिर एनसीसी विभागाने ग्रामीण रुग्णालय परिसर स्वच्छ करून स्वच्छता मोहीम राबवली.यावेळी सांगोला नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाच्या प्रसाद जिरगे व सहकाऱ्यांनी मदत केली.
सदर स्वच्छता मोहीम संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके साहेब, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीसी ऑफिसर मकरंद अंकलगी, उज्वला कुंभार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.