प्रा. डॉ. तृप्ती बनसोडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील दुर्गा पुरस्कार 2024 जाहीर

देवांग समाज रजि.इचलकरंजी यांचे चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन वतीने नवरात्र उत्सवानिमित्त ‘दुर्गा पुरस्कार २०२४’ नुकतेच जाहीर झाले आहेत. श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या अधिपत्याखाली चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशनच्या वतीने समाजातील महिलांना व मुलींना प्रेरणा मिळावी व विविध क्षेत्रात कार्य करण्याकरिता प्रोत्साहन मिळावे याकरिता गेली २ वर्षापासून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा 2024 चा दुर्गा पुरस्कार जाहीर करण्यात आला

त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रा. डॉ. तृप्ती प्रकाश बनसोडे, रा. सांगोला जि सोलापूर यांची निवड करण्यात आली. डॉ. तृप्ती बनसोडे या फॅबटेक कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च सांगोला येथे संगणक अभियांत्रिकी विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण वालचंद कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सांगली येथून पूर्ण झाले. तर त्यांनी एम ई (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग) चे शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथून पूर्ण केले. त्यांनी संगणक अभियांत्रिकी विषयातील शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

 

त्यांच्या संशोधनाचा विषय ऑगमेंटेड रियालिटी म्हणजेच वर्धित वास्तविकता आणि सदर तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानातील अवघड व मूलभूत संकल्पना समजावून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना करता येतो. त्यांना शिक्षण क्षेत्रातील विविध नामवंत पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांचे संगणक अभियांत्रिकी विषयातील संशोधन नामवंत आंतरराष्ट्रीय जनरल मधून प्रकाशित आहे. तसेच त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमधून रिसर्च पेपर सादर केले आहेत. त्या सांगोला महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांच्या सुविद्य पत्नी आहेत. सदर पुरस्कार नवरात्रीनिमित्त नऊ विविध क्षेत्रात म्हणजेच शैक्षणिक, व्यवसाय, कला, सामाजिक, योग यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जाणार आहे.
सदर दुर्गा पुरस्काराचे स्वरूप सन्मान पत्र व मानाची साडी यांनी सन्मानित करण्यात येते, त्याबरोबर दुर्गा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे मुलाखत घेऊन ती चैनल वर नवरात्री दरम्यान दररोज एक मुलाखत प्रसारित करण्यात येते.

या दुर्गा पुरस्कार करिता देवांग समाजाचे श्री विश्वनाथ मुसळे नाना, मा.श्री संजय दादा कांबळे ,सर्व कार्यकारणी मंडळ विश्वस्त, विविध संस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर सौ कल्पना हणमंतराव भंडारे मॅडम, राधिका डिजिटल स्टुडिओ प्रवीण होगाडे, डी.बी. फोटो (ज्ञानेश्वर बुगड),हरिदास सोनटक्के यांचे सहकार्य लाभले,
तसेच सदर दुर्गा पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे मुलाखती चौंडेश्वरी युवती फाउंडेशनच्या सदस्या घेणार असून पुरस्कार सोहळा यशस्वी होण्याकरिता चौंडेश्वरी युवती फाउंडेशनच्या सर्व सदस्या व युवा फाउंडेशनचे सदस्य यांनी नियोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button