महाराष्ट्र

निवडणूक कर्तव्यात कसूर केलेल्या 61 नियुक्त कर्मचारी यांचा प्रस्ताव सादर करणेबाबत

सांगोला प्रतिनिधी – दिनांक 16/03/24 अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा करण्यात आली होती त्या अनुषंगाने 43 माढा लोकसभा मतदारसंघात मतदान दिनांक 7 मे 2024 रोजी पूर्ण झाले त्या अनुषंगाने मतदान केंद्रावर निवडणूक कर्तव्य पार पाडण्यासाठी कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आले होते माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष प्रथम मतदान अधिकारी इतर मतदान अधिकारी म्हणून कर्मचारी यांची नेमणूक केली होती तरी दिनांक 6 /5/ 24 रोजी चे प्रशिक्षणास व मतदान साहित्य स्वीकृतीसाठी 61 कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे

निवडणूक कार्यक्रम कालबद्ध असल्याने वेळेत पार पाडणे महत्त्वाचे आहे तरीही संबंधित कर्मचारी गैरहजर होते त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे व 59 कर्मचारी यांनी सदर नोटीसीचा खुलासा सादर केला नाही तसेच त्याना नोटीस देऊन 7/5/24 रोजी 3:00 वाजेपर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास संबंधिताचे काही म्हणणे नाही असे गृहीत धरून एकतर्फी कारवाई करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी कळवले होते
त्यामुळे सबब संबंधित कर्मचारी यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील 1979 मधील शिस्तभंग विषयक तरतुदी अन्वये कारवाई करणे बाबतचा प्रस्ताव त्यांचे वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात आला त्यांचे वर प्रशासकीय कारवाईच्या अनुषंगाने खाते अंतर्गत चौकशी करून कारवाई करण्याबाब प्रस्तावित करण्यात आली आहे असे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button