प्रभावशाली प्रश्नांनी वेधले आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेचे लक्ष

सांगोला: सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात प्रभावशाली प्रश्नांनी विधानसभेचे लक्ष वेधले.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी भुयारी गटात रस्ते, रस्ते, नवीन ग्रामपंचायत इमारत, नागरी घनकचरा व्यवस्थापनास वाढीव निधी, ट्रॉमा केअर,सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचे प्रश्न, अवैध गौणखनिज, तालुक्यातील शेतकऱ्याचे डाळिंब नुकसान, संगीमा शहरातील इंदरानगर व संजय नगर झोपडपट्टीला संरक्षित झोपडपट्टी म्हणून अधिसूचित करावे,परदेशी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी याविषयी तारांकित प्रश्न उपस्थित केले.
आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला शहरात भुयारी गटारीचे काम सुरु असुन त्या कामामुळे रस्ते उखडले गेलेत. शहरातील या अंतर्गत रस्त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच सांगोला शहरासाठी नगरपालिकेला साधारणता ३ कोटीचा निधी नालेसफाई ,कचरा संकलन व घनकचरा व्यवस्थापनासाठी दिला जातो.तो निधी वाढवुन दिला जावा. त्याचबरोबर शहरातील ट्रामा सेंटरची इमारत तयार असुन यासाठीचे हवी ती पदे भरुन घ्यावीत तसेच आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करुन देऊन हे ट्रामा सेंटर सुरु करावे. सांगोला तालुक्यातील अनेक जिल्हा परीषद शाळेच्या तसेच आंगणवाडीच्या खोल्या नादुरुस्त असुन त्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेअंतर्गत बांधकामा करीता प्रस्तावित गावांना ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी निधी द्यावा. रत्नागिरी ते नागपुर या नॅशनल हायवेचे काम केलेल्या कंपनीने सांगोला व मंगळवेढा तालुक्यात गौणखनिजाचे अवैध रित्या खोदकाम केले असून त्या कंपनीने शासनाचा महसुल बुडवलेला आहे त्या कंपनीवर त्वरित कारवाई करावी. सांगोला तालुक्यातील डाळींब द्राक्ष बागांचे झलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत आर्थिक मदत मिळावी. सांगोला तालुक्यातील विविध रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. २०२५ च्या लोकसंख्येनुसार तालुक्याचा ईष्टांक जास्तीचा आहे.तो ईष्टांक शहरी भागासाठी ४७.५० टक्के व ग्रामीण ७६.४२ टक्के मंजुर केल्यास नागरीकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेता येईल. सांगोला शहरातील संजय नगर झोपडपट्टीत साधारणता ३०० हुन जास्त कुटुंबे राहतात त्यांना संरक्षित झोपड्या म्हणुन घोषीत करुन शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. बौध्द समाजाची अनेक दिवसांची लॅार्ड बुध्दा युनिव्हर्सिटी ची मागणी आहे त्याही मागणीचा विचार करुन त्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी सभागृहात मागणी केली.
एकंदरीत या सर्व प्रश्नांच्या माध्यमातून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला मतदारसंघासह संपुर्ण ग्रामीण भागातील समस्या, अडचणी आणि विकासासाठी आवश्यक उपाययोजनांकडे शासनाचे लक्ष वेधले. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले.



