अखेर पावसाच्या पाण्याने बुद्धेहाळ तलाव वाहू लागला*
बुद्धेहाळ तलाव येथे पाणी पूजन संपन्न*

बुद्धेहाळ(वार्ताहर):- सांगोला तालुक्यातील बुद्धेहाळ येथील तलाव पावसाच्या पाण्याने भरला असून सदर पाण्याचे पाणी पूजन उत्साहात करण्यात आले.
यावेळी परिसरातील विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच व सर्व पक्षीय नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह शेतकरी बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुद्धेहाळ तलाव भरल्याने परिसरातील शेतकरी बांधव आनंदात आहेत.