जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गणवेशाचा नवा लुक

जवळा(प्रशांत चव्हाण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शासनाने ठरवून दिलेल्या गणवेशाचे वाटप जवळा जिल्हा परिषद केंद्रांतर्गत शाळांना तसेच वाकी जिल्हा परिषद केंद्रांतर्गत काही शाळांना झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा नवा लुक आकर्षक वाटत आहे.
गणवेशाच्या नव्या लुकमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. शासनाचा हा समकक्ष स्काऊट गणवेश आहे. मुलांच्या गणवेशाच्या शर्टवर दोन खिसे खांद्यावर दोन लूप्स व मुलींना शर्ट आणि स्कर्ट असा गणवेशाचा पेहराव आहे. या गणवेश वाटप प्रसंगी. शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.