श्री सचिन गोविंद काळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री दादासाहेब जगताप विद्यालय उदनवाडी प्रशालेतील इंग्रजी विषयाचे सहशिक्षक श्री. सचिन काळे सर यांना हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे शिक्षक आमदार मा जयंत आसगावकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शेख, मुख्याध्यापक संघ महाराष्ट्र राज्याध्यक्ष श्री तानाजी माने सर, मार्गदर्शक श्री सुभाष माने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सपत्नीक व सहपरिवार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी श्री काळे सर यांचे वडील गोविंद काळे, आई कमल काळे, पत्नी सौ. निलम काळे मुलगा कौस्तुभ काळे आणि प्रशालेतील शिक्षक  श्री. नेताजी पाटील, श्री. मारुती माने, श्री. लतीब शेख, श्री. मनोजकुमार वलेकर, श्री. कुंडलिक सातपुते, श्री.अमोल ढेरे, श्री. शिवकुमार काळेल, श्री. विवेक पवार, त्याचप्रमाणे श्री काळे सर यांचे मित्र व स्नेही श्री. बबन येडगे, श्री. मुकुंद काळेबाग ,श्री. सचिन पवार, श्री. निलकंठ कुंभार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button