सौ.रुपमती साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते मुस्लिम महिलांचा सन्मान.

.
अल्लाह चे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती सोमवार दि.१६ रोजी सांगोला येथे मंगलमय आणि उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली अल्लाहचे थोर प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती चे औचित्य साधून सौ रुपमती साळुंखे पाटील यांच्या शुभहस्ते मुस्लिम समाजातील लहान मुला मुलींना अध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या सौ.शफिया शेख ,सौ.सुलताना शेख,सौ तसलीम शेख,झीनत मुलाणी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
या महिलांनी मुस्लिम समाजातील पवित्र धर्मग्रंथ कुराण सह इतर आध्यात्मिक गोष्टींचा लहान मुला मुलींना शिक्षण देण्याचे काम अविरतपणे केले आहे याची दखल घेत सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा खतीब यांनी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता यावेळी सौ साळुंखे पाटील यांनी उपस्थित सर्व महिलांच्या कार्याबद्दल माहिती जाणून घेऊन त्यांचे कौतुक करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आगामी काळात मुस्लिम समाजाच्या पाठीशी साळुंखे पाटील कुटुंबीय खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
या सत्कार सोहळ्यासाठी सौ.मुमताज खतीब,मुमताज मुलाणी, सौ.शकीला खतीब,सौ.अंजुम खतीब,नमाजबी मुलाणी,नसीमा इनामदार, रब्बना मुजावर यांच्यासह महिला व मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.