sangola

संकटात मदतीला धावून आले बाळासाहेब सावंत

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला:- भगवंताला शोधण्यासाठी काशी रामेश्वर करण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीला धावूनच आपण भगवंत शोधला पाहिजे हा बोध आजच्या प्रसंगातून बाळासाहेब सावंत यांनी सर्वाना दिला आहे

पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटफळ येथे आपल्या माहेरी आलेल्या व सांगली येथे पोलीस पदावर कार्यरतअसणाऱ्या सौ .महानोर ह्या महिला धाराशिव लांजा एसटी बसने सांगलीला निघालेल्या सांगोला बसस्थानाकावर बस थांबली असता त्यांचे लहान बाळ बेशुद्ध पडले आवाज देऊनही उठत नसल्याने त्या घाबरल्या बाळ कसलेच हाकेला प्रतिसाद देत नाही म्हटल्यानंतर आई बाळाच्या काळजीने हंबरडा फोडू राहिली मोठमोठ्याने ओरडत असताना कोणी तर मदतीला येईल या अपेक्षेने रडू लागल्या परंतु बसस्थानकात सर्व पाहत होते परंतु मदतीला पुढे कोणीच येत नव्हते .

सांगोला बस स्थानकामध्ये हा प्रसंग घडत असताना श्री बाळासाहेब सावंत हे आपल्या ऑफिस च्या कामकाजासाठी जुनोनी या ठिकाणी त्याच बस मध्ये निघाले असताना बस मध्ये मोठमोठ्याने ओरडण्याचा व रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला . नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे सावंत साहेब यांनी प्रसंगावधान ओळखून तत्काळ ते बाळ व महिला यांना घेऊन स्वतः फुले चौकातील डॉक्टर देवकते यांचं हॉस्पिटल मध्ये दाखल झाले .डॉ .देवकते दांपत्यांनी तातडीने त्या बाळाला औषधोपचार चालू केले व ते बाळ शुद्धीवर आले  .”सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” सामान्य नागरिकांच्या संकटात मदतीला धावून जाणाऱ्या महिला पोलिसांना मात्र आज बाळासाहेबांच्या रूपा त त्यांनी देवमाणूस पाहिला .

त्यांच्या बाळाला तत्काळ दवाखान्यात दाखल करून वेळेत उपचारास मदत केल्यामुळे आज ते बाळ शुद्धीवर आले .
त्याबद्दल मातेने बाळसाहेबांचे आभार मानले .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!