सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने आदर्श ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांचा सत्कार संपन्न*

महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त कै जयकुमार जैन वाचनालय बोरी तालुका- जिंतूर जिल्हा परभणी या वाचनालयाचे आदर्श ग्रंथपाल, पञकार बंधू, ग्रंथालय चळवळीतील मार्गदर्शक नेमिनाथ जैन यांनी सांगोला येथे अंबिकादेवी वाचनालय धनगर गल्ली येथे सदिच्छा भेट दिली वाचनालयाचे ग्रंथपाल अमर कुलकर्णी यांनी त्यांचे कामाचे कौतुक करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तसेच ऋषिकेश बुक डीलर छ.शिवाजी महाराज चौक सांगोला येथे सांगोला तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने त्यांचा ग्रंथ ,शाल भेट देऊन सत्कार करण्यात आला .
तसेच नगर वाचन मंदीर सांगोला यांचे वतीनेही सन्मान करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी सांगोला तालुका ग्रंथालय संघाचे संचालक लक्ष्मण दिघे ,दत्ताञय पाटील ,शरद कोळवले ,नगर वाचन मंदीर सांगोला चे आदर्श ग्रंथपाल रणजित भंडारे ,रविकिरण गायकवाड ,उदय पुजारी इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.



