उत्कर्ष विद्यालयात हिंदी निबंध स्पर्धा ,हिंदी सुलेखन स्पर्धा

उत्कर्ष विद्यालय, सांगोला या ठिकाणी 19 सप्टेंबर 2024 रोजी ज्ञानदा कुलातर्फे हिंदी दिन साजरा करण्यात आला. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे .हिंदी विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी म्हणून हिंदी दिनानिमित्त उत्कर्ष विद्यालयात हिंदी निबंध स्पर्धा ,हिंदी सुलेखन स्पर्धा आयोजित  करण्यात आल्या होत्या.

हिंदी दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांची भाषणे तसेच हिंदी कविता पठण व हिंदी साहित्य लेखक प्रेमचंद यांच्या विषयी माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली. तसेच हिंदीचे महत्त्व पटवून देणारे नाटक व हिंदी व्याकरणावर आधारित गीत याचे सादरीकरण इयत्ता पाचवी ते नववी मधील काही विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला महाविद्यालय, सांगोला येथील हिंदी विभाग प्रमुख मा. डॉ. नवनाथ शिंदे सर उपस्थित होते. भारत हा बहुभाषिक देश आहे. त्यामुळे आपल्याला विविध भाषा शिकल्या पाहिजेत परंतु भारतामध्ये सर्वांना जास्त ओळखीची वाटणारी कोमल भाषा म्हणजेच आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे असे सांगून त्यांनी हिंदी भाषेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. भाषा समृद्ध असेल तरच मनुष्य जीवनात प्रगती करू शकतो म्हणूनच भाषेची श्रवण, भाषण ,वाचन ,लेखन ही कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करून भाषा समृद्ध करावी….असे त्यांनी सांगितले. तसेच विविध मूल्य रुजवणारी नावाजलेली शाळा म्हणजे उत्कर्ष विद्यालय असे बोलून विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक मा. नवनाथ शिंदे सर यांनी केले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील  वैभवी लवटे व मनस्वी मिसाळ या विद्यार्थिनींनी केले.

या कार्यक्रमासाठी उत्कर्ष विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री. कुलकर्णी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना आठवड्यातील कोणताही एक दिवस पूर्णपणे हिंदी बोलण्याचा संकल्प करा असे आवाहन केले . हिंदी दिनाचा हा कार्यक्रम उत्कर्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. भोसले सर ,हिंदी विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री. मिसाळ सर ,ज्ञानदा कुल प्रमुख सपताळ मॅडम ,हिंदी विषय शिक्षिका सर्वगोड मॅडम ,मुलाणी मॅडम यांच्या सहकार्याने व ज्ञानदा कुलातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या साह्याने अतिशय उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button