डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्यादित, सांगोले, जिल्हा सोलापूर या संस्थेची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, दि. २४/०९/२०२४ रोजी दुपारी १.०० वाजता संस्थेच्या कामगार भवनमध्ये चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सभेच्या सुरुवातीला स्व.डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस मा. डॉ. प्रभाकर एकनाथ माळी यांचे हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी आदरणीय श्रीमती रतनताई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख व मान्यवर संचालक मंडळ उपस्थित होते. तदनंतर संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड्. नितीन गव्हाणे यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले.

डॉ. प्रभाकर माळी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभेपुढे सादर केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील गिरण्यांची माहिती देताना असे म्हटले की, ६४ गिरण्यांपैकी चालू गिरण्या ५२ आहेत. सहकारी सूत गिरण्या उभारणीचे राज्य शासनाचे धोरण व वाटचाल याची सभेत माहिती देवून मागील ६-७ वर्षापासून वस्त्रोद्योगात निर्माण झालेली अनिश्चितता, राज्य व केंद्र सरकारचे वस्त्रोद्योगा बाबतचे धोरण, सध्याची या उद्योगाची परिस्थिती याची माहिती सभेत दिली.

आपली सूत गिरणीसुध्दा अनेक वर्षापासून आर्थिक अडचणीचा सामना करीत असल्याचे सांगून ते म्हणाले अहवाल सालात संस्थेला रूपये ३३४.७९ लाख रोखड तोटा झाला आहे. कापसाचे दर हे चढेच राहिले असल्यामुळे त्यातुलनेत सूताला दर मिळत नसल्याने सूत गिरण्या चालवणे अतिशय जिकिरीचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सिट्रा नॉर्म प्रमाणे सूताच्या किंमतीमध्ये कापसाचा खर्च ५७% पर्यंत होणे अपेक्षित असताना सध्या हा खर्च ७८% झालेला आहे. त्यामुळे राज्यातील काही गिरण्यांचा अपवाद वगळता एकही गिरणी नफ्यात नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सहकारी सूत गिरण्यांना आर्थिक अडचणींचा विचार करून रू. ५०००/- प्रति चाती प्रमाणे वित्तीय संस्थाकडून कर्ज घेण्यास व त्यावरील १२% पर्यंतचे ७ वर्षांसाठीचे व्याज शासन भरणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आपल्या सूत गिरणीने सोलापूर जिल्हा मध्य. सह. बँकेच्या सहभाग योजनेअंतर्गत रू.२१५५.२० लाख बिनव्याजी कर्ज घेतले आहे. तसेच कामगारांचे भविष्य निर्वाह निधी, ग्रेच्युटी इ. मागिल देणी अहवाल सालात दिली असल्याचे सांगितले.

बहुतांश कामगार स्थानिक असून गिरणीच्या वाटचालीत त्यांचे योगदान बहुमोल असल्याने त्यांची रोजी रोटी चालू राहीली पाहिजे या उद्देशाने आर्थिक अडचणीच्या काळातही सूत गिरणी चालू ठेवली आहे.

भविष्य काळात सूत गिरणीला माफक दरात वीज मिळावी म्हणून सुरुवातीला ३.२ मेगावेटचा सोलार प्लैंट उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ९ रिंगफ्रेम मशिनला कॉम्पॅक्ट सिस्टीम बसविण्याचे काम चालू आहे. यामुळे सूताला प्रति किलो ५ ते ७ रूपये दर ज्यादा मिळणार आहेत. व्याजातील बचत, सोलार प्रकल्पामुळे वीज खर्चातील बचत तसेच कॉम्पॅक्ट मशिनरी इ. मुळे सूत गिरणीचा तोटा कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

बाळासाहेब काटकर, सचिन देशमुख, दिघे गुरूजी, बशीरभाई तांबोळी, चंद्रकांत पाटील यांनी गिरणीच्या कामकाजाबददल, कापूस लागवड, कच्चा कापूस खरेदी, कामगार पगार, बोनस, सभासद ठेवी, अॅटोमायझेशन, व संस्थेकडील अतिरिक्त जमिन याचा फायदा संस्थेसाठी करण्यात यावा इत्यादी बाबत सुचना मांडल्या. सभासदांनी उपस्थित केलेल्या सुचनांवर संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी यांनी मुद्देसूद स्पष्टीकरण केले.

त्यांनतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी मार्गदर्शनपर भाषण करताना प्रथम सर्व संचालकमंडळाचे व उपस्थितांचे अभिनंदन व स्वागत केले. तसेच सोलार प्लॉन्ट केल्यास सूतगिरणीला फायदा होईल, मशिनरी आधुनिकीकरण करणे साठी लागणारा खर्च हा परवडणारा नाही. सूत गिरणीची अतिरीक्त उपलब्ध असलेल्या जागेचा विनियोग करावा अशी त्यांनी सूचना केली. तसेच सूतगिरणी फायदयात आल्यानंतर सामाजिक उपक्रम तसेच सभासदांसाठी विविध फादेशीर योजना राबविल्या जातील. महिला सूतगिरणी लवकरच चालू करण्याचे प्रयत्न ही सूरू आहेत. याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. केले. त्यानंतर मा.श्री. के. एस. माळी चार्टर्ड अकौंटंट, यांनी सभासदांनी मांडलेल्या सुचनांचे निराकरण केले .

सभासदांनी संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहून भविष्यात गिरणीचे कामकाज केले जाईल व त्यासाठी सर्व सभासद बंधू-भगिनींनी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन तथा सभाध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांनी केले.

आजच्या सभेला आदरणीय श्रीमती रतनताई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, जेष्ठ संचालक अण्णासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस दादाशेठ बाबर, माजी तालुका चिटणीस विठ्ठलराव शिंदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव-पाटील, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन अरूण पाटील, माजी सभापती बाळासाहेब काटकर, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, माजी उपनगराध्यक्ष सुरेश माळी, किशोर बनसोडे, माजी जि.प. सदस्य अॅड्. सचिन देशमुख, संगम धांडोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण माळी, गोविंद माळी, भारत माळी, सूत गिरणीचे माजी संचालक शहाजीराव नलवडे, अवधुत कुमठेकर, रामचंद्र लवटे, खरेदी विक्री संघाचे संचालक अॅड्. विशालदिप बाबर, महिला सूत गिरणीच्या अध्यक्षा कल्पनाताई शिंगाडे, उपाध्यक्षा सौ. विद्याताई बाबर, सौ. उषाताई देशमुख, सौ. प्रतिभाताई माळी, तसेच महिला सूत गिरणीच्या सर्व संचालिका, पत्रकार आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व संचालक, सभासद बंधु-भगिनी, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संस्थेचे संचालक मा. श्री. बाळासाहेब बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व सभासदांचे आभार मानले व सभाध्यक्षांचे परवानगीने सभा संपल्याचे जाहिर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button