दुसऱ्या महायुद्धातील शूरवीर ते भारतीय मातेच्या स्वातंत्र्या साठी लढा देणारा योद्धा ( सैनिक) रामचंद्र कृष्णा नरळे उर्फ रामा फलटणे यांचे प्रेरणेतून दिला जाणारा सन्मान तथा पुरस्कार हा दिमाखदार सोहळा रामा फलटणे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मौजे तिप्पेहाळी ता सांगोला येथे बुधवार दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी *रामा फलटणे फार्महाउस* वरती संपन्न होणार आहे. तत्पूर्वी तिप्पेहाळी येथील नामांकित भजनी मंडळ यांचा श्रवणीय कीर्तन तसेच पुष्पवृष्टी सोहळा ४ ते ६ या वेळेत होणार आहे.
तदनंतर लगेचच भजन, कीर्तन, कुस्ती, सामाजिक कार्य, क्रीडा व शेती या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करुन तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या व्यक्तींचा उथोचित सत्कार करनेत येणार आहे. तरी फलटणे परिवार आणि हितचिंतकाकडून सर्वांना विनंती करनेत येते की सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ काढून व कार्यक्रमासाठी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.