फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आजी आजोबा कृतज्ञता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आजी आजोबा प्रतिनिधी सौ. सुरेखा रुपनर, स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील ए. ओ. वर्षा कोळेकर, सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ मनीषा शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आजी आजोबांचे मार्गदर्शन मिळावे, संस्कृतीचा ठेवा जतन व्हावा, तसेच आजी आजोबा हे कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आजी-आजोबा दिवस साजरा करत आहोत हे आपल्या मनोगतात व्यक्त केले. स्कूलचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी वाढत जाणारी वृद्धाश्रमांची संख्या याबद्दल खंत व्यक्त करून एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व सांगितले. आजी आजोबा मनोगत मधून श्री बाळासाहेब उबाळे यांनी सांगोलामधील विद्येचे माहेरघर म्हणजे फॅबटेक एज्युकेशन सोसायटी आहे हे सांगितले. तसेच विजयश्री देशमुख, वाघमोडे गुरुजी, सौ.लिगाडे या आजी आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्कूलमध्ये आजी-आजोबा यांच्यासाठी फनी गेम्सचे व संगित खुर्चीचे आयोजन करण्यात आले होते. आजी आजोबांनी उत्स्फूर्तपणे खेळाचा आनंद घेतला.
संगीतखुर्ची मध्ये प्रथम क्रमांक सौ .विजयश्री दिगंबर देशमुख, द्वितीय क्रमांक सौ.कलावती रामचंद्र जगताप, तृतीय क्रमांक श्री.रावसाहेब तुकाराम देशमुख यांनी मिळवला.विजेता आजी आजोबांना प्रशिस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अनिता शिनगारे यांनी केले. तर आभार कु. काजल मिसाळ यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.