सांगोला: भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांची जयंती संपूर्ण भारतभर अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते. त्याचे औचित्य साधून फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये अभियंता दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
यामध्ये मेकॅनिकल विभागाने विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व श्री गणेश इंडस्ट्रीज चे मालक श्री दिपक मुंगसे यांचे एक्सपर्ट लेक्चर चे आयोजन केले होते. तसेच कॉम्प्युटर विभागाने ब्लाइंड सी आणि क्विज़ कॉंपीटिशन या स्पर्धा घेऊन अभियंता दिन साजरा केला.सिव्हिल विभागाने बांधकाम क्षेत्रात काम करत असताना लागणाऱ्या व नव्याने निर्मिती झालेल्या विविध सॉफ्टवेअर संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी नेहा इन्फोटेक चे फाऊंडर प्रथमेश माने यांना आमंत्रित केले होते.इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने सीडॅक च्या आर अँड डी विभागाचे गणेश कारंडे यांचे एम्बेडेड सिस्टीम या विषयावर मार्गदर्शन लेक्चर आयोजित केले होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागाचे विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. सदर कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रूपनर,कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे व प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.