महाराष्ट्र
यशस्वी उद्योजक आतिश उर्फ बंटी रजपूत सन्मानित

संत कवी श्रीधर स्वामी देवस्थान ट्रस्ट नाझरे ता. सांगोला तर्फे येथील यशस्वी उद्योजक आतिश उर्फ बंटी रजपूत यांना नुकतेच गौरविण्यात आले आहे.
नाझरे येथे दादा सिंग राजपूत यांनी प्रथम छोटे दुकान मोठ्या कष्टाने सुरू केले व त्यांच्या निधनानंतर पार्वती राजपूत यांनी मोठ्या कष्टाने हा गाडा पुढे सूरू करून आज त्यांचे सुपुत्र बंटी यांनी त्याचा वटवृक्ष निर्माण केला व त्यामुळे त्यांना सदरचा पुरस्कार डॉक्टर शिवाजीराव ढोबळे, शिक्षक नेते अशोक पाटील, सुनील बनसोडे, पत्रकार रविराज शेटे, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, आनंदा बनसोडे, नागेश महाराज, ट्रस्टचे संयोजक जयंत काका देशपांडे, विनोद देशपांडे, ओंकार देशपांडे, राजाराम खोकले इ. च्या शुभहस्ते शाल, ट्रॉफी, श्रीफळ देऊन बंटी यांना गौरविण्यात आले आहे. यावेळी सचिन शिंदे, जानवी रजपूत, आराध्या रजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.