सांगोला विद्यामंदिरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न*

२६ जानेवारी २०२५ शहात्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्रसेनानी, देशभक्त गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास सांगोला विद्यामंदिर १९७५ दहावी बॅचचे माजी विद्यार्थी उद्योजक दिपक चोथे, चंद्रकांत पतंगे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संविधान उद्देशिकीचे वाचन करण्यात आले..त्यानंतर संपन्न झालेले एन.सी.सी संचलन, मनोरे प्रात्यक्षिक व सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण मंत्रमुग्ध करणारा ठरला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,खजिनदार शंकरराव सावंत, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप, १९७५ दहावी बॅचचे माजी विद्यार्थी व भारतीय आर्मी सेवेत असलेले सांगोला विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त प्राचार्य, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, विद्यमान पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले शहरातील , शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेष आटपाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी केले.
—————-
प्रजासत्ताक अस्तित्वात आल्यानंतर संसदीय लोकशाहीच्या चौकटीत भारताने जे काही साध्य केले ते अभिमानाने उल्लेख करावा असे आहे. पूर्णपणे लोकशाही स्वीकारून प्रगती करणे हे देशासाठी दिव्य होते. तरीसुद्धा भारत देशाने विविध क्षेत्रात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे परंतु येणारा काळ हा नाविन्यतेचा असणार आहे हे ओळखून आपण आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेला ‘स्वर्णिम भारत: विरासत आणि विकास’ या प्रजासत्ताक दिनाच्या थीमनुसार भारताच्या समृद्ध संस्कृतिक वारशावर भर देत आणि आधुनिकीकरणाच्या प्रगतीवरती प्रकाश टाकत आपल्या कर्तव्याप्रती दक्ष राहिलो तरच भारतीय प्रजासत्ताक चिरायू होईल व त्यातूनच आपली लोकशाही, संस्कृती जगाला अधिक दिशादर्शक ठरेल.
*प्रा.धनाजी चव्हाण*