sangola

डॉक्टर महावीर महादेव आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने उदनवाडी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर

डॉक्टर महावीर महादेव आलदर यांच्या आलदर हॉस्पिटलच्या वतीने उदनवाडी गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे बालकांचे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते
यावेळी विकास वलेकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या संधरभात रुग्णांना व त्यांच्या पालकांना आरोग्यांविषयी माहिती दिली . तसेच डॉ आलदर हे उदनवाडी गावचे सुपुत्र असून उदनवाडीतील व सांगोला तालुक्यातील लोकांना गेले ६ वर्ष झाले २४ तास सेवा देत असून हेच आपले भाग्य असल्याचे सांगितले.

यावेळी डॉ महावीर आलदर यांनी लहान बाळाना होणारे आजार व घेण्याची काळजी व आलदर हॉस्पिटल मधे नवजातशिशु अतिदक्षता विभाग , लहान बाळासाठी अतिदक्षता विभाग व सर्जरी विभागातील रुग्णांसाठी आलदर हॉस्पिटल हे आलदर हॉस्पिटॉल हे २४ तास आपल्या सेवेत तयार आहे . गरीब व गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान करत सध्या योजने अंतर्गत गरीब व गरजू रुग्णांचा भरपूर फायदा होत असल्याचा त्यांनी सांगितले

या कार्यक्रमासाठी आरोग्य सेविका रिना कदम , रुक्मिणी सरगर , रामहरी मिसाळ , प्रियांका आलदर ,सुनीता वलेकर , अनिता साबळे , आबासो आलदर , फिरोज खान , विशाल गाडे , वर्षा गाडे , आर्यन आलदर , सुनील बुरूंगे व नितीन भोसले यांच्या सह पालक मोठ्या संखेने उपस्थित होते .

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!