सांगोला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘अर्थवेध’ या पोस्टरचे उद्घाटन संपन्न
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित दि.30 सप्टेंबर 2024 रोजी ‘अर्थवेध’ या पोस्टर प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची उद्दिष्टे विद्यार्थ्याना आर्थिक क्षेत्रातील नवीन प्रवाह, कल्पना, संकल्पना, सामान्य ज्ञान वाढवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाचा दृष्टिकोन वाढविणे ही होती.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजित पाटील (सेबी संस्था विषयक मार्गदर्शक व सीडीएसएल चे व्याख्याते,मुंबई) हे लाभले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर.भोसले यांनी भूषविले.
या कार्यक्रमामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सद्यस्थितीमध्ये असणारे ज्वलंत अर्थशास्त्रीय प्रश्न जसे लोकसंख्या वाढ, बेकारी एक भीषण समस्या, भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे, भारताचा विदेशी व्यापार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अशा प्रश्नांवरती स्वतःची मते मांडणारे पोस्टर्स बनवले. तसेच सदरीकरण देखील केले. या कार्यक्रमासाठी बीए व बीकॉम मधील अर्थशास्त्र विषयाचे 52 विद्यार्थी उपस्थित होते तर 25 विद्यार्थ्यांनी अर्थवेध पोस्टरसाठी आपले लेख दिले.
यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे डॉ. अजित पाटील म्हणाले की, भारत हा महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे कारण भारतामध्ये 62% युवाशक्ती आहे आणि या युवाशक्तीमध्ये भारताला महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य आहे. अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अर्थशास्त्र हा दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा विषय असून या क्षेत्रात रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत आणि यांचा शोध आपल्या विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे डॉ. बाबर एन. ए. यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय प्रा. गोडसे पी. डी. यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. भुंजे एस. एस. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वेदपाठक एम. डी. यांनी मांडले. या कार्यक्रमासाठी इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख डॉ. मासाळ ए. आर., कार्यालयीन अधीक्षक शिंदे पी. एस. तसेच सांगोला महाविद्यालयातील प्रा. पाटील एस. जी., प्रा. उबाळे व्ही. एम. व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य, प्राध्यापक व प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.