फॅबटेक पॉलिटेक्निक चा श्री गणेश इंडस्ट्रीज बरोबर सामंजस्य करार
सांगोला(प्रतिनिधी):श्रीगणेश इंडस्ट्री या मेकॅनिकल इंजिनियरिंग क्षेत्रातील कंपनीबरोबर फॅबटेक पॉलिटेक्निक ने सामंजस्य करार केला असल्याची माहिती मेकॅनिकलचे विभाग प्रमुख प्रा.दत्तात्रय नरळे यांनी दिली. अशाप्रकारे सामंजस्य करार केल्यामुळे विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान शिकवण्या समदत मिळणार आहे. तसेच इंडस्ट्रियल व्हिजिट एक्सपर्ट लेक्चर साठीकंपनी कडूनसहकार्य मिळणार असून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात झेप घेतायावी यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहन मिळणार असल्याचे पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांनी सांगितले.
यावेळी कंपनीचे ऑनर श्री दिपक मुंगसे यांनी विद्यार्थ्यां ननवउद्योजक बनण्यासाठी व शैक्षणिक प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. .या सामंजस्य करारावेळी प्राचार्य तानाजी बुरुंगले,पॉलिटेक्निकचेट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.तन्मयठोंबरे, वर्कशॉप सुप्रीनटेंडन्ट प्रा. अरुण लोखंडे, प्रा. अजय भोसले ,प्रा.श्रीकांत बुरुंगले, प्रा. भावना माईनकर,प्रा. बिरा वगरे उपस्थित होते.