सोलापुर जिल्ह्यातील ७ मतदारसंघावर शरद पवारांचा डोळा ; मातब्बर राजकीय घराणी फोडण्यास सुरूवात ?

सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी शरद पवार यांचा डोळा आहे. त्यामुळेच त्यांनी हे सर्व मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी कॉंग्रेसचे सुशील कुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशी जवळीक साधली आहे.

विधानसभा निवडणुकीत सकृतदर्शनी महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असाच सामना होणार आहे. परंतु खरी लढत ही शरद पवार  विरूद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत होणार आहे. त्यामुळेच सोलापुर जिल्ह्यात सध्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.

सोलापूर जिल्हा हा एकेकाळी शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिला होता. परंतु त्यांची ही चलती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडून काढली. त्यातच पक्ष फुटीनंतर जिल्ह्यातील अनेक मातब्बर राजकारणी नेते, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी अजित पवार यांच्यासोबत गेलेत. यामुळे शरद पवार फारच दुखावले. त्यातून त्यांनी पुन्हा एका आपला स्वत : चा एक गट सोलापूर जिल्हात पुन: स्थापित करण्यासाठी जिल्ह्यात काम सुरू केले आहे. यानुसार आता शरद पवारांनी जिल्हातील मातब्बर राजकीय घराणी फोडण्यास सुरूवात केलीय.

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मोहिते पाटील घरण्यास भाजपपासून फोडून स्वपक्षाशी जोडून घेण्यास पवारांनी  खेळी यशस्वी ठरली आहे. त्यानंतर त्यांनी तब्बल सात वेळा आमदार राहिलेले बबनराव शिंदे यांच्या घरण्यात फुट पाडत त्यांचे बंधू रमेश शिंदे यांचा चिरंजीव धनराज यांना बळ देण्यास सुरूवात केलीय. पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात परिचारक घराणे भाजपपासून कसे दुरावेल यासाठी काम केले. याच ठिकाणी त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना अडचणीत टाकलंय.

टोकाच्या सांगोला तालुक्यातही शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या नातवांना बळ देण्याची भूमिका घेतलीय. याठिकाणी सध्या शिवसेना शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील आमदार आहेत. पुणे व नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या करमाळा तालुक्यावर तर शरद पवार यांची पहिल्यापासून नजर आहे. याठिकाणी अजित पवार गटात असलेले विद्यमान आमदार संजय शिंदे आणि भाजपच्या रश्मी बागल-कोलते यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी मोहिते पाटलांच्या माध्यमातून माजी आमदार नारायण पाटलांना पवारांनी  बळ दिलंय.

दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या दोन मतदारसंघात महायुतीला दणका देण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच सिद्धेश्वर परिवारचे धर्मराज काडादी यांना दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारीची गळ घातल्याची चर्चा आहे. तसेच झाल्यास सिद्धेश्वर परिवारच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या दोन्ही ठिकाणी हायव्होल्टेज लढती बघायला मिळण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button