भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष पुनरिक्षण घोषीत झालेला आहे. त्यानुसार दि. 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्रावर, तहसिल कार्यालय, तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय व www.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. मतदारांनी आपली नावे मतदार यादीत आहे किंवा कसे याबाबत खात्री करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले आहे
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या मतदानादिवशी ज्या मतदारांची नावे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत अथवा वगळलेली गेलेली असल्याने ज्या मतदारांना मतदान करता आले नाही, अशा मतदारांची पडताळणी करण्यात आली असून, अशा मतदारांकडून 2 हजार 172. मतदारांकडून फॉर्म नंबर- 6 भरून घेऊन त्यांची नावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तरी देखील अद्यापही कोणत्या मतदारास आपले नाव मतदार यादीत नाही असे वाटत असेल तर त्यांनी आपआपल्या विधानसभा मतदार संघामधील निवडणूक शाखेशी (तहसिल कार्यालय) संपर्क साधून नाव आहे. अगर कसे याची खात्री करून नाव नसल्यास फॉर्म नमुना क्र-6 voter.eci.gov.in व voter हेल्पलाईन ॲप याद्वारे भरण्यात यावेत
आगामी सार्वत्रिक विधानसा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आपली नावे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावे. ज्यांच्या दुरूस्ती असतील त्यांनी दुरूस्ती करून घ्यावी. व ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन voter.eci.gov.in व voter हेल्पलाईन, बी एल ओ व मतदार नोंदणी कार्यालय याठीकाणी जाऊन आपले नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत. व आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.