सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन फॅबटेक टेक्निकल कॅम्पस चे चीप अकाउन्टन्ट श्री.सुनिल टाकळे व प्रा.के.एम .दुधाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अमोल पोरे, ग्रंथपाल प्रा. सुधीर माळी, ग्रंथपाल प्रा. मोहन लिगाडे, श्री.शंकर देशमुख, दिलीप महाडिक यांच्या सह आणि विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर ,कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, डिग्री इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.