मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे संजीवनी वेलनेस सेंटर व देवसागर साधक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नंदेश्वर येथील माऊली मंदिरासमोरील पटांगणात योग विज्ञान व निसर्गोपचाराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज बोलताना म्हणाले की, आनंदी जीवनासाठी योग व निसर्गोपचार अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर पाच हजार वर्षाची परंपरा असलेल्या आयुर्वेद व निसर्गोपचाराशिवाय आनंददायी जीवन जगणे अशक्य आहे त्यासाठी दैनंदिन जीवनातून वेळ काढून योग करणे गरजेचे आहे.
यावेळी संतोष दुधाळ व नितीन मोरे यांनी मार्गदर्शन केले तसेच सत्येंद्रसिंग धीरज व पवार मॅडम यांनी शिबीरामध्ये तपासणी व उपचार केले.शिबिराच्या आयोजनासाठी देवसागर साधक ट्रस्टसह सुधीर गरंडे,अण्णा बंडगर,नवनाथ मेटकरी,महादेव क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
योग विज्ञान शिबिराच्या सांगता समारंभामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव जानकर,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष (शिंदे गट) पै.अशोक चौंडे,चेतना पतसंस्थेचे चेअरमन बापू गरंडे,माजी प्राचार्य भारत बंडगर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मेटकरी,भारत गरंडे,बाळू मोटे, माणिक पाटील,भागवत कांबळे भगवान भोसले,चंदू लाड शामराव बंडगर,पोपट बंडगर, मारुती गरंडे,दिनेश मेटकरी, तानाजी गरंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.