सांगोला विद्यामंदिर उपमुख्याध्यापकपदी प्रा.गंगाधर घोंगडे तर उपप्राचार्यप्रदी प्रा. लक्ष्मण विधाते यांचे नियुक्ती

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला उपमुख्याध्यापकपदी प्रा.गंगाधर घोंगडे यांची उपप्राचार्य या पदावरून पदोन्नतीने तर प्रा.लक्ष्मण विधाते यांची सेवाज्येष्ठतेनुसार ज्युनिअर कॉलेज उपप्राचार्यपदी निवड झाली.
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मं.श.घोंगडे यांचे शुभहस्ते यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी प्राचार्य लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक अजय बारबोले,पोपट केदार, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
नूतन उपमुख्याध्यापक प्रा. गंगाधर घोंगडे हे सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे उपप्राचार्यपदी कार्यरत होते. तर नूतन उपप्राचार्य प्रा.लक्ष्मण विधाते हे ज्युनिअर कॉलेज गणित विषयाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते.
यानिमित्ताने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य,प्राचार्य लक्ष्मण जांगळे, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नूतन उपमुख्याध्यापक व उपप्राचार्य यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..