*तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सांगोला विद्यामंदिर चे वर्चस्व*

क्रीडा संकुल, सांगोला येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या 19 वर्ष वयोगट मुले या संघाने अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल स्कूल सांगोला या संघाचा पराभव करत अजिंक्यपद पटकावले.
वरील संघास श्री नरेंद्र होनराव सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा विभाग प्रमुख ज्युनिअर कॉलेज- प्रा. डी.के पाटील, ,श्री सुभाष निंबाळकर सर, प्रा.संतोष लवटे. यांचे सहकार्य लाभले.
वरील सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव मा. मल्लिकार्जुन घोंगडे सर, सहसचिव मा. प्रशूद्धचंद्र झपके साहेब, संस्था सदस्य मा. विश्वेशजी झपके, प्राचार्य श्री गंगाधर घोंगडे सर, उपमुख्याध्यापक श्री लक्ष्मण विधाते सर, उपप्राचार्या सौ शाहिदा सय्यद मॅडम, पर्यवेक्षक – श्री बिभीषन माने सर, श्री पोपट केदार सर (क्रीडा नियंत्रक), श्री अजय बारबोले सर. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.*