सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे दुपारी 12 वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा व संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे .
या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शहाजीबापू पाटील हे भूषविणार आहेत. या मेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख मुबिना मुलाणी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व फलनिष्पत्ती यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्षा तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांनी दिली आहे.
सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळाव्यासाठी शिवसेना महिला तालुकाध्यक्षा राणीताई माने, शिवसेना महिला शहर प्रमुख छायाताई मेटकरी ,शिवसेना महिला शहर समन्वयक शोभाकाकी घोंगडे, शोभाताई देशमुख, महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे, राजलक्ष्मी पाटील, राणीताई पाटील, शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्रीमती लतिका मोटे, मनीषा लिगाडे ,रोहिणी बनसोडे ,झाकीरा तांबोळी, रुकसाना मुजावर आदी महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केले आहे.