सांगोल्यात मानगंगा परिवार को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

सांगोला: अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मानगंगा परिवार को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सांगोला शाखेचा स्थलांतरित सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संस्थेच्या वाढत्या विस्तारामुळे हेड ऑफिस आणि शाखा वेगळी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे सध्याची शाखा मुख्य कार्यालय म्हणून कार्यरत राहणार असून सांगोला शाखा स्टेशन रोडवरील श्री मधुनाना कांबळे यांच्या इमारतीत प्रशस्त जागेत स्थलांतरित झाली आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक आणि चेअरमन श्री नितीन (आबासाहेब) इंगोले यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी संस्थेचे संचालक श्री सचिन इंगोले, श्री सुखदेव रदवे, श्री विवेक घाडगे, श्री विजय वाघमोडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती लाभली .या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री बाबुराव गायकवाड, सांगोला तालुका शिवसेना प्रमुख श्री दादासाहेब लवटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री चेतनसिंह केदार सावंत, मराठा मोर्चाचे समन्वयक श्री अरविंद केदार, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन श्री रमेश जाधव, युटोपियान शुगर चे कृषी अधिकारी धनंजय व्यवहारे, सेवानिवृत्त आयएफएस अधिकारी श्री माणिकराव भोसले, सांगोला रोटरी क्लबचे सचिव श्री विलास बिले, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजेंद्र यादव, वटी चार्टमधील श्री दत्तात्रय बनकर, श्री नवनाथ महाकाळ, डॉक्टर विक्रम शिंदे, उद्योजक अजय इंगोले, चेअरमन अरुण सुरवसे, युवा नेते दादासाहेब जगताप, सेल्स मॅनेजर श्रीकांत भोसले, श्री सिद्धेश्वर इंगोले,डीसीसी बँकेचे शाखाधिकारी श्री भोसले, श्री धनाजी शिर्के, युवा उद्योजक सुयोग नलावडे, इंजिनिअर संतोष भोसले, संतोष गुडमरे, इंजिनिअर हमीदभाई शेख, डॉक्टर साजिकराव पाटील ,श्री दीपक चोते, श्री अरविंद दुबे, विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन श्री दीपक बंद्रे, सुवर्ण रत्न मल्टीस्टेटचे चेअरमन श्री बिराजदार गुरुजी, सेवानिवृत्त मेजर तानाजी खटकाळे, श्री बाबासो मुटकुळे, श्री भूषण तारळेकर, श्री महादेव शिंदे, श्री दत्ता शिंदे, धनाजी दिवसे ,श्री जयेश कांबळे, श्री गावडे सर, श्री नवले सर, एडवोकेट विक्रांत बनकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सभासदांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याचा मानस संस्थेचे चेरमन श्री नितीन (आबासाहेब ) इंगोले यांनी व्यक्त केला .संस्थेने आरटीजीएस, आयएमपीएस, एनईएफटी, मोबाईल बँकिंग, विविध ठेवी योजना, ठेवीवर कर्ज, विविध प्रकारच्या कर्ज योजना अशा आधुनिक सेवा सभासदांना प्रदान करून अल्पावधीतच नावलौकिक केला आहे .सांगोला शाखेच्या या नवीन प्रवासाला सभासदांचा विश्वास आणि आधार लाभावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.