सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला शहर, तालुका व आसपासच्या तालुक्यामध्ये प्रसिध्द असलेल्या कांबळे कलेक्शनच्या वतीने 26 सप्टेंबर 2022 ते 15 आक्टोंबर 2022 या कालावधीत नवरात्र सणानिमित्त 2000 रुपयांच्या वस्त्र खरेदी वर जिंका आकर्षक बक्षीसे याची सोडत शनिवार दि.5 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता काढण्यात आली. या ऑफरला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.
प्रथम क्रमांक ई-बाईकचे बक्षीस डॉ.करमुडे (सांगोला) यांना मिळाले आहे. द्वितीय क्रमांकाचे फ्रिजचे बक्षीस स्वप्नाली केदार (कडलास) यांना मिळाले आहे. तृतीय क्रमांक वॉशिंग मशीनचे बक्षीस सोमनाथ महांकाळ (सांगोला) व आबासाहेब इमडे (सावे) यांना मिळाले आहे. चतुर्थ क्रमांकाचे मिक्सरचे बक्षीस तानाजी पवार (वाढेगाव), मानसिंग बाबर (मानेगाव), प्रियांका मिसाळ (चिणके), आनंद गयाळी (वाणीचिंचाळे), प्रभाकर गायकवाड (उंबरगाव) यांना मिळाले आहे.