महाराष्ट्र
सांगोला महाविद्यालयातील प्रा.डॉ. राम पवार व अधिक्षक श्री.प्रकाश शिंदे यांना महाराष्ट्र् राज्य् शाळा कृती समितीचा पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र् राज्य् शाळा कृती समितीच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील प्रशंसनीय जनसेवेच्या गौरवार्थ सन. 2024-25 मध्ये देण्यात येणारा सिनिअर कॉलेज कृतीशील प्राध्यापक पुरस्कार महाविदयालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्व्यक प्रा.डॉ. राम पवार व सिनिअर कॉलेज कृतीशील अधिक्षक पुरस्कार श्री. प्रकाश् शिंदे यांना प्रदान करण्यात आला.
या निमित्त् महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते त्यांना शाल, गुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्त्र कर्मचारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. राम पवार व अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी पुरस्कार मिळालेबदद्ल आपले मनोगत व्यक्त् करुन, सत्कार केले बदद्ल त्यांनी सर्वांचे आभार मानले.