सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या नर्सरी ते सिनी केजी या वर्गातील विद्यार्थी व शिक्षकांनी क्षेत्रभेटींतर्गत इमडेवाडी सावे ता. सांगोला येथील कामसिध्द मंदिरास भेट दिली.
इमडेवाडी येथे निसर्गरम्य वातावरणात भव्य असे कामसिध्द मंदिर आहे. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम विद्यार्थी व शिक्षकांनी श्री.कामसिध्दाचे दर्शन घेतले त्यानंतर भजन, प्रार्थना म्हणण्यात आली. तदनंतर विद्यार्थ्यांनी तेथे विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. शेवटी सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला व त्यानंतर या क्षेत्रभेटीचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी,शिक्षक व शिक्षिका हे विद्यालयात परतले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ही क्षेत्रभेट संपन्न झाली.
ही क्षेत्रभेट यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या प्र.मुख्याध्यापिका कु. सुकेशनी नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.