महाराष्ट्र
जागतिक पोलिओ दिनानिमित्त रोटरी क्लब सांगोला मार्फत जनजागृती

२४ ऑक्टोबर हा दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगामध्ये पोलिओ निर्मूलनासाठी रोटरी मार्फत प्रचंड प्रमाणात काम केले आहे. जगभरातील पोलिओ उच्चाटन करण्यासाठी रोटरीचा सिंहाचा वाटा आहे. आज या दिनाचे औचित्य साधून सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोटरी सदस्यांनी पोलिओ बाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी चला एकत्र येऊया, पोलिओ मुक्त जगाचे स्वप्न साकार करूया अशा पद्धतीने लोकापर्यंत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. इंजि.विकास देशपांडे,रो.इंजी.विलास बिले ,रो. दीपक चोथे,रो.इंजि.संतोष भोसले रो.शरणापा हळलीसागर ,रो.धनाजी शिर्के तसेच सांगोला केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.