सांगोला तालुक्यात हरितक्रांती घडविणार :आमदार शहाजीबापू पाटील
महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद येथे जंगी स्वागत व सत्कार संपन्न

सांगोला/ प्रतिनिधी: 1990 पासून तालुक्याच्या राजकारणात अनेक चढउतार पाहिले. 7 वेळा विधानसभा निवडणूक लढविली. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले. 1995 व 2019 ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती आली. टेंभू ,म्हैसाळ, उजणीचे पाणी तालुक्याला आणले त्यातून निश्चितपणे शेतीचा व शेतकऱ्याचा विकास होणार आहे. तालुक्यात हरितक्रांती घडविण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे यात खरा आनंद आहे. असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिकमहुद येथे व्यक्त केले.
253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील हे शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एबी फॉर्म घेऊन महुद येथे आले . यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या स्वागत व सत्कारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला तालुका मजूर पुरवठा करणारा तालुका म्हणून तालुक्याची ओळख होती . हे चित्र बदलण्यात आले आहे .तालुक्यात लवकरच मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येत असून तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही .पुढील वर्षाच्या दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या शेतात पाणी पाहायला मिळेल अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली. तसेच विरोधक माझ्यावर मोकळी टीका करतात .आधी त्यांनी काय केले हे तपासावे. या विधानसभा निवडणुकीत दीपकआबा साळुंखे यांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मला 1 लाख 25 हजार मते मिळतील अशी खात्री व विश्वास आहे .भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी मोठ्या मनाने मतदान करावे असे आवाहन बापुंनी यावेळी केले.
चिकमहुद येथे सत्कार व स्वागत समारंभासाठी रेखाताई पाटील, वृषाली पाटील, वैशाली पाटील ,राजलक्ष्मी पाटील, सरपंच शोभा कदम, ग्रामपंचायत सदस्य सुनीता हुबाले, सोनाली काटे, दीक्षा कदम ,सागरदादा पाटील, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मुबिना मुलाणी, दिग्विजयदादा पाटील, बाळासाहेब आसबे ,संजय मेटकरी ,बालाजी बागल ,प्रितेश दिघे, समीर पाटील, दीपक ऐवळे , अजितकुमार ताटे ,सुभाष इंगवले, दिलीप कारंडे ,आप्पासाहेब सरगर, जगदीश पाटील, मधुकर कदम, शिवाजी घेरडे, लक्ष्मण भोसले आदी शिवसेना ,युवा सेना पदाधिकारी,,विविध संस्थांचे पदाधिकारी , मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजयदादा शिंदे, दादासाहेब लवटे, नितीन गायकवाड ,एन वाय.भोसले सर, दीपक दिघे, दत्ता नागणे ,पांडुरंग हाके ,राजनंदनी पाटील, श्रीकांत पाटील, पंकज काटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आमदार शहाजी बापू पाटील यांना शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून मिळालेली महायुतीची उमेदवारी व एबी फॉर्म लखोट बापूंच्या जीवनातील ऐतिहासिक व आनंददायी क्षण आहे . विरोधकांना तीन पिढ्या जे जमलं नाही ते बापूंनी पाच वर्षात करून दाखवलं. तालुक्यात टेंभू, म्हैसाळ, उजनी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालू झाल्यानंतर तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खऱ्या अर्थाने राज्याला व तालुक्याला न्याय दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून महिलांना खऱ्या अर्थाने सन्मान दिला आहे .
शहाजीबापू पाटील हे सोमवारी दि 28 ऑक्टोबर 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत .यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असून विरोधकांना याची निश्चितपणे चपराक बसेल .विरोधकांनी तालुक्याच्या विकासासाठी 55 वर्षात आणलेला निधी व शहाजीबापू पाटील यांनी 5 वर्षात आणलेला निधी याची तुलना केल्यास बापूंना प्रथम क्रमांक मिळेल .आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सत्कार समारंभासाठी व स्वागतासाठी चिकमहुद येथे जंगी तयारी करण्यात आली होती .फटाक्यांची आतषबाजी व जेसीबीतून फुलांची उधळण करीत आमदार शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद ते जंगी स्वागत करण्यात आले . सत्कार झाल्यानंतर कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन सभा आयोजित केली होती. यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी बंधू आणि भगिनींची विशेष गर्दी पाहिला मिळाली.