महाराष्ट्र

धायटी, संगेवाडी येथील शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या  नेतृत्वाखाली शिवसेनेत केला जाहीर प्रवेश

सांगोला /प्रतिनिधी:  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  शिवसेनेत सांगोला तालुक्यातील धायटी तसेच संगेवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सध्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांची संख्या वाढत असून  तरुणांची फळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आहे .

सांगोला तालुक्यातील धायटी गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या असंख्य युवा कार्यकर्त्यांनी  रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश करून आमदार शहाजीबापू पाटील यांना समर्थ साथ देऊ व येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी जीवाची बाजी लावू असे आश्वासन यावेळी  दिले . शिवसेनेत पक्षप्रवेश  केलेल्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी  शुभेच्छा देत अभिनंदन केले.

पक्षप्रवेशावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले,  युवा सेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे, गणेश कदम, शिवसेनेचे चोपडी गावचे नेते चेअरमन दगडू बाबर, संग्राम बाबर यांच्यासह आदी मान्यवर, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला तालुक्यातील धायटी गावातील शेतकरी कामगार पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विकासाच्या मुद्द्यावरती एकत्रित येऊन शिवसेनेत प्रवेश करून आमदार शहाजीबापू पाटील यांना विधानसभा निवडणुकीत मोलाची साथ देण्याचे जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button