सांगोला तालुका

पायोनियर स्कूल य. मंगेवाडी च्या विद्यार्थांच्या वतीने इस्त्रो च्या शास्त्रज्ञांना व सीमेवरील जवानांना राख्या

राखी पौर्णिमा सणाच्या निमित्ताने य. मंगेवाडी येथील पायोनियर इंग्लिश व सेमी इंग्लिश मिडीयम व पायोनियर गुरुकुल शाळेत भव्य राखी प्रदर्शन भरविण्यात आले होते.        विद्यार्थांच्या कल्पना शक्ती व कार्यक्षमतेचा विकास व्हावा या उद्देशाने या राखी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी कापड , कागद तसेच फुलांपासून सुंदर व आकर्षक  रंगीबेरंगी राख्या बनविल्या होत्या..
     राखी पौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक पवित्र सण मानला जातो .त्याचे पावित्र्य  शाळेतील विद्यार्थ्यांनी जपले..यावेळी शिक्षकांनी राखी पौर्णिमा सणाचे महत्व व इतिहास पटवून सांगितला..
      भारत मातेचे रात्रंदिवस रक्षण करणाऱ्या आपल्या बहाद्दूर जवानांना व चांद्रयान ३ यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांना व इस्रो च्या शास्त्रज्ञांना स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या स्पीड पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या..
      पायोनियर शाळा नेहमीच आपली संस्कृती जपण्याचे काम करत असते..विद्यार्थांना ज्ञान व संस्कार देवून एक परिपूर्ण भावी पिढी घडविण्याचे कार्य करीत असल्याबद्दल विविध स्तरातून पायोनियर शाळेचे कौतुक होत आहे. कार्यक्रमाचा उद्देश व महत्व शाळेची ८ वी तील विद्यार्थीनी कुमारी.प्रणिती पवार हिने समजून सांगितला.तर सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ.राऊत बी. टी . मॅडम यांनी केले.राखी प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनिल येलपले सर व  सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री रूपनर  सर सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी मेहनत घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!