महाराष्ट्र

भव्य मोटरसायकल रॅलीसह शक्तीप्रदर्शन करीत  प्रचंड मोठ्या जनसमुदायाचा आशीर्वाद घेऊन महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगोला/ प्रतिनिधी: उद्याची विधानसभा निवडणूक ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. तालुक्यातील प्रत्येक घरातील व्यक्ती समृद्ध करण्याचे माझे ध्येय आहे .सांगोला तालुका हिरवागार होईपर्यंत हा शहाजीबापू पाटील स्वस्त बसणार नाही. सांगोला तालुक्यातील एक गावही पाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी मला विजयी करावे मी तालुक्यात नामदार म्हणूनच परत येईन असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला येथे केले .
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 रोजी भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर मतदार बंधू भगिनींचे आशीर्वाद घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ,शिवतीर्थ येथे  सभा घेण्यात आली. यावेळी मतदार बंधू-भगिनींना मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील हे बोलत होते.
पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मी यापूर्वी 7 विधानसभा निवडणुका या स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात लढविल्या . विधानसभेची ही आठवी निवडणूक  नवख्या उमेदवाराविरुद्ध लढवत आहे. विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही तुमची काळजी घ्या .ही लढाई विकासासाठी आहे. तालुक्यात मतदारांमध्ये विष पेरायचे काम कोणीही करू नये. तालुक्यात युवकांची मोठी ताकद असून मी केलेल्या विकास कामावर जनतेचा पूर्णपणे विश्वास आहे. त्यामुळे कोणी काहीही केले तरी  विजयाचा गुलाल हा माझाच आहे .असा ठाम विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्या मतदार बंधू-भगिनींना दिला.
यावेळी सुभाषभाऊ इंगवले, राणीताई माने, दादासाहेब लवटे, शंकर दुधाळ, श्रीकांतदादा देशमुख, डॉ. विजय बाबर ,नवनाथभाऊ पवार, ॲड .बंडू काशीद ,धोंडीराम घोलप , दीपक ऐवळे , शिवाजीनाना पवार  शिवाजीअण्णा गायकवाड, धनाजी पवार, धनंजय चव्हाण ,,विकास वलेकर, श्रीकांत पाटील, आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी देण्यासाठी व तालुक्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयी करून  नामदार करण्यासाठी  ही 2024 सालातील विधानसभा निवडणूक चुरशीची ठरणार आहे .यामध्ये मतदार बंधू-भगिनींनी गाफिल न राहता बापूंच्या कार्यकर्तृत्वावर व केलेल्या कामावर खुश होऊन मोठ्या मनाने बापूंना भरघोस मतांची आघाडी देऊया. सांगोला तालुक्यात महायुतीची जागा निवडून आणायची आहे. बापूंना मंत्रिपद मिळणार आहे.  राज्यातील इतर कोणत्याही तालुक्यात सांगोला तालुक्याइतका विकास निधी आला नाही हे श्रेय बापूंचे आहे. हे आपण आनंदाने  मान्य करून बापूंची इच्छा, आकांक्षा पूर्ण करूया .आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात 5 हजार 500 कोटी रुपयांचा विकास निधी आणून प्रत्येक गावामध्ये विकास घडवून आणला आहे. भाळवणी गटातून 10 हजार मतांची आघाडी देऊ असा विश्वास धोंडीराम घोलप यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सभेसाठी सागरदादा पाटील ,दिग्विजयदादा पाटील, चेतनसिंह केदार सावंत, आनंदाभाऊ माने, माऊली तेली , अस्मिर तांबोळी ,कीर्तीपाल बनसोडे, उद्योगपती आनंद घोंगडे ,अरुण बिले ,अच्युत फुले, विजयदादा शिंदे, समीर पाटील , जगदीश पाटील, गुंडादादा खटकाळे, धनंजय काळे, अभिजीत नलवडे, रविराज शिंदे, बाळासाहेब आसबे ,भारत चव्हाण,अजिंक्य शिंदे, समाधान सावंत ,सोमेश्वर यावलकर, आयुब मुलाणी, दीपक दिघे यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयतक्रांती संघटना या पक्षांचे पदाधिकारी  ,कार्यकर्ते, मान्यवर व मतदार बंधू भगिनी तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————–
 महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर व कार्यावर विश्वास ठेवून सांगोला शहर व तालुक्यातील अनेकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला .प्रवेश केलेल्या मान्यवरांमध्ये फिरोज खाटीक, भाऊसाहेब नवले, अल्ताफ मुलाणी, सद्दाम मुलाणी ,बशीर मुलाणी, हणमंत येलपले, विनायक पवार यांच्यासह आदी मान्यवरांनी शिवसेनेत प्रवेश करून आमदार शहाजीबापु पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी योगदान देण्याचे जाहीर केले.उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जनसमुदायाची भव्य  मोटरसायकल रॅली काढण्यात आली .त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी सभा घेण्यात आली व जनसमुदायाचा आशीर्वाद घेऊन आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालय येथे दाखल  केला. यावेळी तालुक्यातून प्रचंड जनसमुदाय, बंधू-भगिनी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
—————————————–
 आमदार शहाजी बापू पाटील यांचा महायुतीतून अर्ज भरण्यात आला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील, ॲड .उदयबापू घोंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार – सावंत ,माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे हे मान्यवर उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button