स्टेशन रोडसह सांगोल्यातील सर्वच भागातील रस्त्यांची दुरावस्था ,शहरातील धुळीवर उपाययोजना तात्काळ कराव्यात :- शहीद अशोक कामटे संघटना

अनेक वर्षापासून सांगोला शहरातील स्टेशन रोडची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे .त्यामुळेच महात्मा फुले चौक ते नेहरू चौकासह शहरातील सर्वच भागात यादरम्यान धुळीचे लोटच्या -लोट दिवसभरात उठत आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेले आहे यावर तात्काळ उपायोजना कराव्यात अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
स्टेशन रोड येथील धुळ व रस्ता दुरुस्तीबाबत अनेकदा यापूर्वी नगरपालिकेकडे मागणी केलेली आहे, सांगोला शहरातील स्टेशन रोड येथील रस्त्याची फार मोठी दुरावस्था झाली असून त्यामुळे महात्मा फुले चौक ते नेहरू चौक पर्यंत धुळीचे साम्राज्य संपूर्ण शहरात पसरलेले आहे, रस्त्यावरील दुरुस्त केलेली पूर्णपणे खडी निघून अस्ताव्यस्त झालेली आहे सर्वत्र मलमपट्टी करून देखील पुन्हा जैसेथी अवस्था झालेली आहे .त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही तसेच या धुळीमुळे व्यापारी, रहिवाशी ,नागरिक यांना श्वसनाचे व खोकल्याचे गंभीर आजार वाढत आहे, तसेच देशपांडे प्लॉट मध्ये ड्रेनेजला आउटलेट नसल्याने बेले वखारी नजीक तळ्याचे स्वरूप आले आहे
या गटारीचे पाणी संपूर्ण रस्त्यावर व इतरांच्या प्लॉटमध्ये शिरकाव करत आहे ,शहरातील नागरिक आपापल्या भागातील परिसरातील स्वच्छता करून मेटाकुटीला आलेला आहे. शहरात वाढलेले गवत ,काटेरी झुडपे काढणे गरजेचे आहे .त्यामुळे रोगराई ,डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. नगरपरिषदेकडून शहरात कचऱ्याचे ढिगारे,देशपांडे प्लॉटमध्ये तुंबलेल्या गटारीतून घाणीचे साम्राज्य वाढले आहे ,तिकडे डेंगूसदृश्य आजाराचा प्रभाव वाढत असताना नगरपालिकेकडून दक्षता घेतली जात नाही फवारणी, साथीच्या आजाराबाबतची जनजागृती कागदावरच दिसत आहे त्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे घराची वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येक प्रभागात तुंबलेल्या, फुटलेल्या गटारी व त्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य सर्वत्र आहे परिणामी डासांचे प्रमाण वाढले असून शहरात डासांच्या उपद्रवामुळे थंडी, ताप ,खोकला यासह डेंगू सदृश्य आजाराचे प्रमाण वाढले आहे . तसेच महात्मा फुले चौक ते जुन्या स्टेट बँकेपर्यंत कोणतीही सार्वजनिक मुतारी , शौचालय नसल्याने महिला व पुरुषांची मोठ्या प्रमाणात गैरसोय व कुचंबना होत आहे तरी नगरपालिकेने या समस्येचे निराकरण करावे.कागदोपत्री स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याने सांगोलकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्षाकाठी रस्ते व स्वच्छतेच्या नावावर कर करोडो रुपयांचा कर वसूल करून या सुविधा देण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. नगरपालिका शहरातून सर्वत्र करुरुपी महसूल गोळा करते मग नागरी सुविधा देताना कुचराई का करते? या प्रश्न मुख्याधिकारी यांना भेटण्याचा व संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही यावरून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ चा प्रत्यय दिसून आला. तरी या प्रश्न नगरपालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. यापूर्वी रस्ते, गटारी, स्वच्छते कामाकरिता अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत या प्रश्न दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने दिला आहे.
————-
सांगोला नगरपालिकेस देशपांडे प्लॉट ड्रेनेज, स्टेशन रोड रस्त्यांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे, रस्ता रुंदीकरण्याच्या नावाखाली अनेक वेळा येथील अतिक्रमणे काढली ,पण नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना या प्रश्न वेळ नसल्याचे दिसून येत आहे नगरपालिका प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहु नये, येत्या काळात तातडीने हा विषय मार्गी न लावल्यास नगर परिषदेसमोर शहरातील नागरिकांच्या समवेत हलगीनाद आंदोलन करण्यात येणार आहे याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषदेची राहील. :-नीलकंठ शिंदे सर ,संस्थापक शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.