सिध्दवा जिरगे यांचे निधन
सांगोला(प्रतिनिधी):- मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील व सध्या सांगोला शहरातील रहिवाशी सिध्दवा नाना जिरगे यांचे सोमवार दि.6 नोव्हेंबर रोजी वृध्दापकाळाने निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय 89 होते. त्यांच्या पश्चात 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.बीएसएनचे चे सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय नाना जिरगे यांच्या त्या आई होत.
त्यांचा तिसरा दिवस उद्या बुधवार दि.8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता वाढेगाव नाका येथील लिंगायत स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.